
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावऱण आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं सीमेवर कुरापती केल्या जात आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत कारवाईची माहिती दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि कर्नल सोफिया कुरैशी आणि व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली.