'बॅट'च्या घुसखोरीचा डाव जवानांनी उधळला

पीटीआय
Thursday, 19 September 2019

जम्मू-काश्‍मीरमधील 370वे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या असून, पाकच्याच सीमा कृती पथकाच्या (बॅट) सैनिकांनी बारा आणि तेरा सप्टेंबर रोजी भारतीय हद्दीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला; पण तो भारतीय जवानांनी उधळल्याचे उघडकीस आले. भारतीय लष्कराच्या या कारवाईचा एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध झाला असून, यामध्ये भारतीय जवान हे पाकच्या सैनिकांवर ग्रेनेड हल्ला करून त्यांना मारताना दिसत आहेत.

हाजीपीर भागात भारताचा बॉंब वर्षाव
श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील 370वे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या असून, पाकच्याच सीमा कृती पथकाच्या (बॅट) सैनिकांनी बारा आणि तेरा सप्टेंबर रोजी भारतीय हद्दीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला; पण तो भारतीय जवानांनी उधळल्याचे उघडकीस आले. भारतीय लष्कराच्या या कारवाईचा एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध झाला असून, यामध्ये भारतीय जवान हे पाकच्या सैनिकांवर ग्रेनेड हल्ला करून त्यांना मारताना दिसत आहेत.

या घुसखोरांना ठार करण्यासाठी भारतीय जवानांनी व्याप्त काश्‍मीरमधील हाजीपीर सेक्‍टरमध्ये बॉंब हल्ले केले. मागील महिन्यामध्येही भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये "बॅट'च्या टीममधील काही कमांडोंना ठार मारण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचे बॅट कमांडो भारतीय हद्दीमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असून व्याप्त काश्‍मीरमधून त्यांच्या भारतविरोधी कारवाया सुरू आहेत.

पाककडून शस्त्रसंधी उल्लंघन
जम्मू - जम्मू आणि काश्‍मीरमधील सांबा-कथुआ सेक्‍टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्संनी आज भारतीय चौक्‍यांवर गोळीबार केला. पाककडून या वेळी गोळीबार करण्यात आला; तसेच तोफगोळेही डागण्यात आले. याला भारतीय सैनिकांनी जशासतसे प्रत्युत्तर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली ही चकमक अकरापर्यंत सुरू होती, अशी माहितीही सूत्रांनी दिली. यामध्ये कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan bat Army Indian Border Firing Jawan