esakal | "भारतातील ३० टक्के मुस्लिम एकत्र आल्यास चार नवे पाकिस्तान बनू शकतात"; तृणमूलच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
sakal

बोलून बातमी शोधा

tmc leader shaikh alam

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगला आहे. दरम्यान, विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करताना विविध पक्षांचे नेते वादग्रस्त विधानं करत असल्याचं दिसून येत आहे.

"भारतातील ३० टक्के मुस्लिम एकत्र आल्यास चार नवे पाकिस्तान बनू शकतात"; तृणमूलच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगला आहे. दरम्यान, विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करताना विविध पक्षांचे नेते वादग्रस्त विधानं करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानं पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चक्क पाकिस्तानचा (Pakistan) उल्लेख करत वादग्रस्त विधान केलं. यामुळे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

बीरभूम (Birbhum) जिल्ह्यातील नानूर (Nanoor) विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विधानचंद्र मांझी हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी तृणमूलचे नेते शेख आलम (Shaikh Aalam) प्रचार करत होते. प्रचारादरम्यान आलम म्हणाले, "भारतातील ३० टक्के मुसलमान एकत्र आले तर भारतात चार नवे पाकिस्तान बनू शकतात. मग जे ७० टक्क्यांबाबत बोलतात ते कुठं जातील?" दरम्यान, आधी वादग्रस्त विधान केल्यानंतर आलम यांना नंतर उपरती झाली आणि ते म्हणाले, "आपल्या या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो" 

दरम्यान, आलम यांच्या विधानावर बंगाल भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय (Amit Malviy) यांनी सडकून टीका केली आहे. मालवीय म्हणाले, "ममता दीदींचा आलम यांच्या विधानाला पाठिंबा आहे का? तसेच आपल्याला असा बंगाल हवा आहे का? असा प्रश्नही त्यांनी ट्विटद्वारे बंगालच्या जनतेला विचारला. 

'साडीत पाय दिसणं बरं नव्हे'; ममतांबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यानं दिलं स्पष्टीकरण

आलम यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री तापस चटर्जी म्हणाले, यासाठी भाजपचं कारणीभूत आहे कारण भाजपचे नेते बंगालमध्ये येऊन हिंदू-मुसलमान अशी चर्चा करत आहेत. 

२०१६च्या निवडणुकीतही पाकिस्तानचा उल्लेख!

सन २०१६ च्या विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारचं एक वादग्रस्त विधान करण्यात आलं होतं. ते विधानही तृणमूल काँग्रेसच्याच एका मंत्र्यानं केलं होतं. त्यावेळी पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मंत्री फिरहाद हकीम (Firhad Hakim) यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाच्या एका पत्रकाराला म्हटलं होतं, "मी तुम्हाला कोलकाताच्या मिनी पाकिस्तानात घेऊन जातो." कोलकात्यातील गार्डनरीच भागाबाबत ते बोलत होते. त्यांच्या या विधानाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता तसेच त्यांच्यावर टीकाही झाली होती. 

loading image