

Pakistan Chief of Defence Forces
esakal
Asim Munir CDF : पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल झाला आहे. संसदेने मंजूर केलेल्या नव्या कायद्यामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांची सूत्रे आता एकाच अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आली आहेत. फील्ड मार्शल असीम मुनीर हे पाकिस्तानचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ (CDF) बनले असून, लष्करप्रमुखपदासोबतच त्यांच्याकडे तिन्ही दलांचे वैधानिक आणि कार्यकारी नेतृत्व आले आहे. ‘डिफेन्स फोर्सेस ऑफ पाकिस्तान अॅक्ट, २०२६’ अंतर्गत ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ (CDF) हे नवे पद निर्माण करण्यात आले आहे.