पाकिस्तान अखेर नरमले; कुलभूषण जाधव यांना 'कौन्सेलर ऍक्‍सेस'

पीटीआय
रविवार, 1 सप्टेंबर 2019

भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अखेर 'कौन्सेलर ऍक्‍सेस' देण्यास तयारी दर्शवली आहे. त्यानंतर आता भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची सोमवारी (ता. 2) भेट घेता येणार आहे.

इस्लामाबाद : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अखेर 'कौन्सेलर ऍक्‍सेस' देण्यास तयारी दर्शवली आहे. त्यानंतर आता भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची सोमवारी (ता. 2) भेट घेता येणार आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आणि व्हिएन्ना करारानुसार जाधव यांना भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना भेट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहंमद फैसल यांनी सांगितले.

जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप पाकिस्तानने ठेवला आहे. भारताने मात्र हा आरोप फेटाळताना जाधव यांना इराणमधून अटक करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर इराणमध्ये व्यवसायासाठी ते गेले होते, असेही भारताने स्पष्ट केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan To Provide Consular Access To Kulbhushan Jadhav Tomorrow says Foreign Office