Pakistan Reaction: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानचा जळफळाट; प्रसिद्धी पत्रक जारी करत म्हणाले, "सोहळ्याचा आम्ही..."

pakistan reaction on ayodhya ram mandir: प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काही तासांनंतर पाकिस्तानने या सोहळ्याचा निषेध केला आहे. याबाबत पाकिस्ताने निवेदन जारी केलं आहे.
Pakistan Reaction
Pakistan ReactionEsakal

देशभरात काल(सोमवारी) रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच सर्वत्र मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. देशभरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात आली. देशातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, मिरवणुका, रॅली काढण्यात आल्या. देशभरात आनंदाचं उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं.

मात्र, या देशातील उत्साहामुळे पाकिस्तानची जळफळाट झाल्याचे दिसून येत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काही तासांनंतर पाकिस्तानने या सोहळ्याचा निषेध केला आहे. याबाबत पाकिस्ताने निवेदन जारी केलं आहे.

Pakistan Reaction
Mexico First Ram Temple : अयोध्येपूर्वीच मेक्सिकोमध्ये झाली श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा; देशातील पहिल्या राम मंदिराचं लोकार्पण

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक्सवर (X) या सोशल मिडीयावर एक प्रसिद्धी पत्रक शेअर केले आहे. “भारतातील अयोध्या शहरातील बाबरी मशीद पाडून त्याजागी बांधण्यात आलेल्या राम मंदिराचा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आम्ही निषेध करतो”, असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

Pakistan Reaction
Canada Ram Mandir : राम मंदिरामुळे निवळला भारत-कॅनडा तणाव? ट्रुडो सरकारने घोषित केला विशेष दिन!

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात लिहिले आहे - "अयोध्येत मशिदी होती त्या जागेवर मंदिर बांधल्यामुळे भारताच्या लोकशाही चेहऱ्याला काळा डाग लागला आहे. विशेष म्हणजे, यानंतर आता वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मुथरेतील शाही ईदगाह मशिदीचाही आता नंबर लागणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही यादी वाढतच जात आहे. या मशिदींनाही विनाशाचा सामना करावा लागलणार आहे”, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Pakistan Reaction
Ram Mandir Darshan : अयोध्येतील मंदिर आजपासून दर्शनसाठी खुलं! भाविकांची पहाटेपासून तुफान गर्दी

"भारतातील 'हिंदुत्व' विचारसरणीच्या वाढत्या लहरीमुळे जातीय सलोखा आणि प्रादेशिक शांततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतातील वाढत्या इस्लामोफोबिया, द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांची दखल घेतली पाहिजे. इस्लामिक वारसास्थळांचे अतिरेकी गटांपासून संरक्षण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण आपली भूमिका बजावली पाहिजे", असंही निवेदनात म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com