Mexico First Ram Temple : अयोध्येपूर्वीच मेक्सिकोमध्ये झाली श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा; देशातील पहिल्या राम मंदिराचं लोकार्पण

Even before Ayodhya, Sri Rama's life was celebrated in Mexico: मेक्सिकोमधील क्यूरेटारो या शहरात हे राम मंदिर उभारण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, मेक्सिकोतील हनुमानाचं पहिलं मंदिर देखील याच शहरात आहे.
Mexico First Ram Temple
Mexico First Ram TempleeSakal

First Ram Temple in Mexico : आज केवळ अयोध्या किंवा भारतच नाही, तर संपूर्ण जग राममय झालं आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे. दरम्यान मेक्सिकोमध्ये यानिमित्ताने पहिल्याच राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी अमेरिकी पंडिताने श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा पार पाडली.

मेक्सिकोमधील भारतीय दूतावासाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरून या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. 21 जानेवारी रोजी सायंकाळी हा सोहळा पार पडला. मेक्सिकोमधील क्यूरेटारो या शहरात हे राम मंदिर उभारण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे, मेक्सिकोतील हनुमानाचं पहिलं मंदिर देखील याच शहरात आहे. या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा एका अमेरिकी पंडिताच्या हस्ते करण्यात आली होती. या सोहळ्याला मेक्सिकन नागरिक देखील उपस्थित होते.

Mexico First Ram Temple
US Ram Bhajan Video : अमेरिकेतील राधाकृष्ण मंदिरात एकवटले श्रीरामभक्त, घुमला रामनामाचा गजर; पाहा व्हिडिओ

या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. (Idols of Sri Rama, Lakshmana and Sita are installed in the temple) या मूर्ती भारतातून मागवण्यात आल्या होत्या. यावेळी मेक्सिकोमधील कित्येक भारतीय नागरिक मंदिरात उपस्थित होते. पूजा-आरती केल्यानंतर रामनामाचा जप करण्यात आला. यावेळी संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्न होतं, असंही भारतीय दूतावासाने स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com