
नवी दिल्ली : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेने दिलेल्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानच दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याचा पुनरुच्चार करताना पाकिस्तानने लादेनला आश्रय दिला होता याकडे लक्ष वेधले आहे. दुर्मीळ धातूंच्या पुरवठ्याबाबत आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार व्यापारासाठी चीनशी संपर्क साधण्यात येत असल्याचेही भारताने गुरुवारी स्पष्ट केले आहे.