गझनवी क्षेपणास्त्राची काय आहेत वैशिष्ट्ये...

वृत्तसंस्था
Thursday, 29 August 2019

पाकिस्तानने आज (गुरुवार) सकाळी गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केली. गझनवीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणेः

नवी दिल्लीः पाकिस्तानने आज (गुरुवार) सकाळी गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले आहे. गझनवी क्षेपणास्त्राच्या चाचणीमागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा हेतू असू शकतो.

गझनवीची वैशिष्ट्येः

  • 290 किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता.
  • या क्षेपणास्त्रामधून विविध हत्यारे वाहून नेण्याची क्षमता.
  • जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता.
  • गझनवी आकाराने मोठे असल्याने मोठे बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता.
  • स्वतःसाठी लागणारे इंधन व ऑक्सिजन बरोबर ठेवण्याची व्यवस्था.
  • परमाणू युद्धासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan test fires surface to surface ballistic missile Ghaznavi