
Ceasefire Violation Confirmed: भारत-पाकिस्तानमध्ये संध्याकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू झाली होती. त्यानंतर तीन तासातंच पुन्हा भारतीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून ड्रोन हल्ले सुरु झाले. याची गंभीर दखल भारतानं घेतली असून ही परिस्थिती पाकिस्ताननं समजून घ्यावी, असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी सरकारला केलं आहे. रात्री ११ वाजता तातडीची पत्रकार परिषद घेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं आहे.