
प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवसाआधी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद'ची घोषणा दिली गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवसाआधी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद'ची घोषणा दिली गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी सकाळी-सकाळी खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ ई-बाईक रेस दरम्यान 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, तुघलक रोड पोलिस स्टेशनला एक पीसीआर कॉल आला, ज्यात खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ 'पाकिस्तान जिंदाबाद'ची घोषणा देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना तेथे 2 पुरुष, 3 महिला आणि एक अल्पवयीन आढळले.
फाईलवर मुख्यमंत्र्यांनी केली सही, त्यानंतर शेराच बदलला; मंत्रालयात घडला...
दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, दोन कुटुंब आपल्या मुलांसोबत इंडिया गेट पाहण्यासाठी आले होते. त्यांनी ई-बाईक किरायाने घेतली होती. त्यांनी ई-बाईक शर्यत लावताना एकमेकांची नावं पाकिस्तानसह अनेक देशांच्या नावावर ठेवली. यावेळी त्यांनी आनंदात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारेही दिले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.