
Viral News : येत्या 26 जुलै 2025 ला कारगिल युद्धाला 26 वर्षं होतील. पण आजही या युद्धाच्या जखमा तितक्याच ताज्या आहेत ते या युद्धात शहीद झालेल्या शहिदांच्या आठवणींच्या रूपात. आज भारत पुन्हा एकदा पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या तयारीत असताना पुन्हा एकदा कारगिल युद्धाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पण ज्या 22 वर्षीय सैनिकाच्या बलिदानामुळे कारगिल युद्धाची सुरुवात झाली तो होता पाकिस्तानच्या हल्ल्याला बळी पडलेला भारतीय सैन्यातील कॅप्टन सौरभ कालिया. त्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं ? त्याच्या बलिदानाचा बदला भारताने कसा घेतला घेऊया जाणून.