Pakistan Flag : भारत-पाक तणावात आणखी भर! ऐतिहासिक जागेवरून पाक झेंडा हटला; पाकिस्तानविरोधी भावनेतून प्रतिक्रिया उमटल्याचा संशय

Simla Agreement : सिमला करार झालेल्या ऐतिहासिक टेबलावरील पाकिस्तानचा झेंडा अदृश्य झाल्याने खळबळ उडाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर उफाळलेल्या पाकिस्तानविरोधी भावनांमुळेच हा झेंडा हटवण्यात आला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
Pakistan Flag
Pakistan Flagsakal
Updated on

सिमला : सिमला कराराची स्वाक्षरी १९७२ मध्ये ज्या टेबलावर झाली, त्या राजभवनातील टेबलावरचा पाकिस्तानचा झेंडा आज गायब झाल्याचे दिसून आले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर भारताने सिंधू करार रद्द केलेला असताना दुसरीकडे पाकिस्तानने सिमला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचे पडसाद भारतात उमटत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com