
पाकिस्तानमधील नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले असून, सर्वसामान्य नागिरकांची आर्थिक परिस्थित बिकट आहे. कोरोना व्हायसपासून बचाव करण्यासाठी एकाने चक्क एटीएममधून सॅनिटायझरची चोरी केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कराची (पाकिस्तान): पाकिस्तानमधील नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले असून, सर्वसामान्य नागिरकांची आर्थिक परिस्थित बिकट आहे. कोरोना व्हायसपासून बचाव करण्यासाठी एकाने चक्क एटीएममधून सॅनिटायझरची चोरी केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Video : डॉक्टर अधिक्षकचा रुग्णालयात सुटला कंट्रोल अन्...
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. प्रत्येकजण काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, पाकिस्तानमधील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. महागाईमुळे ते मेटाकुटीला आले आहेत. पण, कोरोना व्हायरसपासून स्वत: ला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे लोकांना चक्क चोरी करावी लागत आहे. एका चोराने चक्क एटीएममध्ये ठेवलेले सॅनिटायझर चोरले.
बायको माझी अन् बोलते त्याच्याशी; कसं चालेल...
पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने ट्विटरवरून चोरीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एटीएममधून प्रथम बाहेर येतो आणि नंतर खाली वाकून सॅनिटायझरने हात साफ करतो. नंतर तेच सॅनिटायझर खिशात टाकतो. इनायतने व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, 'जेव्हा आपल्याला असे वाटते की कोणीही आपल्याकडे पाहात नाही.' संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत.
When you think no one is watching you.. pic.twitter.com/2V08SHHdwg
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) March 29, 2020
दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 1500च्या पुढे गेली आहे. शिवाय, 14 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.