पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यानंतर आरोग्य मंत्र्यांनाही कोरोनाचा संसर्ग

Pakistans Health Minister Tests Positive For COVID-19
Pakistans Health Minister Tests Positive For COVID-19

कराची : संपूर्ण जगभारात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूमुळे परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक होत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यानंतर आरोग्य मंत्र्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आरोग्यमंत्री डॉ. जफर मिर्जाही करोना संक्रमित झाले आहेत. आरोग्यमंत्री मिर्जा यांच्या कोरोनाचा चाचणीचा अहवाल काल (ता. ०६) सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर जफर मिर्जा यांनी स्वत:ला घरातच क्वारइंटाइन केलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान याआधी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आलं होतं. दोन्ही नेत्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सोमवारी मिर्जा यांनी ट्विटरद्वारे करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मला कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यावेळी योग्य ती काळजीही घेतली. कोरोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी स्वत: ला होम क्वारंटाइन करत आहे. यावेळी मिर्जा यांनी करोना लढ्यातील आपल्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं होतं.

-------------
 चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू
-------------
भारत-चीन युद्ध झाल्यास अमेरिका मैदाना उतरणार; व्हाईट हाऊसची घोषणा
-------------
परराष्ट्रमंत्री कुरैशी आणि आरोग्यमंत्री मिर्जा यांच्याशिवाय पाकिस्तानमधील इतर नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामधील काही नेत्यांचा मृत्यूही झाला आहे. असद कैसर, शहबाज शरीफ, इमरान इस्माइल, सईद गनी आणि शेख राशिद यांनी करोनावर मात केली आहे. तर सैयद फजल आगा, शाहीन रजा, गुलाम मुर्तजा, मुनीर खान, मियां जमशेद दीन काकखेल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

डॉ. मिर्जा पाकिस्तानमधील कोरोनाविरुधच्या लढाईचे नेतृत्व करत होते. त्यांना अनेक टीकेंचा सामनाही करावा लागला होता. डॉ. मिर्जा आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लपवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानमध्ये दिवसागणिक कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. सोमवारी देशात तीन हजार ३४४ नवे रुग्ण आढळले. पाकिस्तानमधील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख ३१ हजार इतकी झाली आहे. आतापर्यंत चार हजार ७६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com