
जम्मू : दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर मुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री भारताविरुद्ध युद्धाची ठिणगी टाकण्यात आली. जम्मू, उधमपूर, जैसलमेर आणि पठाणकोटसह अनेक ठिकाणी ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला. एस-४०० या यंत्रणेद्वारे हे सर्व हल्ले निष्प्रभ करण्यात आले. बुधवारी रात्रीही पाकिस्तानने १७ हून अधिक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट, बहावलपूर येथे थेट हल्ले केले. या कारवाईत पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने पाडण्यात आली.