Palamu Tiger: ‘प्रताप’ वाघ बनला राष्ट्रीय पोलीस तिरंदाजी स्पर्धेचा शुभंकर; बेतला अभयारण्याचा गौरव

Palamu Tiger Pratap, National Police Archery Championship, Betla Tiger Reserve : झारखंडमधील पलामू व्याघ्र प्रकल्पातील ‘प्रताप’ वाघाची रांची येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या अधिकृत शुभंकर म्हणून निवड झाली आहे.
Palamu tiger Pratap has been selected as the official mascot for the All India Police Archery Championship in Ranchi.

Palamu tiger Pratap has been selected as the official mascot for the All India Police Archery Championship in Ranchi.

esakal

Updated on: 

झारखंड: झारखंडमधील पलामू व्याघ्र प्रकल्पातील (PTR) ‘प्रताप’ या वाघाची रांची येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचा अधिकृत शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे. २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. बेतला राष्ट्रीय उद्यानातील कॅमेरा ट्रॅपमध्ये टी-०७ (T-07) या क्रमांकाने नोंद झालेल्या प्रतापला या निवडीमुळे राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रासोबतच झारखंडमधील वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाघाची ताकद, शौर्य आणि एकाग्रता ही तिरंदाजी स्पर्धेच्या भावनेशी जोडण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com