
आजपासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर बसेल एवढा दंड
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत अनेकदा दिली गेली असूनही अनेकांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड अजूनही लिंक नाहीत.आयकर विभागाकडून (Income Tax Department) आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत दिली गेली होती.मात्र ती मुदत वाढवून नंतर ३१ मार्च २०२३ केल्या गेली.मात्र आता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्समार्फत (CBDT)आता एक मोठा निर्णय घेण्यात आलाय.त्यानुसार ज्यांनी अजूनही त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसतील त्यांना आता ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. (PAN and Adhar linking News)
त्यामुळे आता जे लोक ३० जून २०२२ पर्यंत त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणार नाहीत त्यांना ५०० रूपये दंड भरावा लागणार आहे.आणि ही डेडलाईन गेल्यानंतर हा डंड दुप्पटही करण्यात येणार आहे.याचाच अर्थ १ जुलैपासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार आहे.
हेही वाचा: Aadhar Card चा गैरवापर रोखायचाय? असं करा लॉक- अनलॉक
पॅन आणि आधार लिंक न केल्यास नेमकं काय होणार ?
दिलेल्या मुदतीत पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास ते निष्क्रिय मानल्या जाईल.२०२२ सिडीबीटी सर्क्युलर नुसार लिंक नसलेल्या पॅन आणि आधार कार्डला अश्या वेळी अवैध मानल्या जाईल.त्यानंतर ते अॅक्टिव्ह करण्यात अनेक अडचणी उद्भवू शकतात.
Web Title: Pan And Adhar Card Charges Will Be Double From 1 July Said Central Board Of Direct Tax
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..