
Aadhar Card चा गैरवापर रोखायचाय? असं करा लॉक- अनलॉक
आपल्याला प्रत्येक कामासाठी आधार कार्डाची गरज लागते. त्याचा दुरूपयोग होऊ नये यासाठी तुम्हाला तुमच्या सुविधेनुसार आधार लॉक- अनलॉक करावे लागते. UIDAI च्या वेबसाईनुसार, UIDAI ने तुमचा आधार क्रमांक लॉक- अनलॉक करण्याची नवीन फिचर लॉंच केले आहे. तुमचा आधार क्रमांक लॉक केल्यावर आधार क्रमांकाचा उपयोग करून ऑथेंटिकेशन करता येत नाही. त्यात ऑथेंटिकेशन करण्यासाठी व्हर्च्युअल आयडीचा नंबरचा उपयोग करू शकता. त्यामुळे दुसरी व्यक्ती तुमच्या नंबरचा उपयोग करू शकणार नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही तुमचा आधार क्रमांक पुन्हा अनलॉक करू शकता.
हेही वाचा: Aadhar Card News : निळं आधार कार्ड कोणाला मिळतं जाणून घ्या!
लॉक-अनलॉक बायोमेट्रिक्स पर्याय कसा आहे?
आधार कार्ड धारकांना या सुविधेद्वारे त्यांचे बायोमेट्रिक्स मर्यादित काळासाठी लॉक- अनलॉक करता येईल. बायोमेट्रिक्स लॉक झाल्यावर ऑथेंटिकेशनसाठी त्यांचे बायोमेट्रिक्स वापरू शकणार नाहीत.
हेही वाचा: Amazonच्या होळी स्पेशल स्टोअर मधून मिळणार ७० ते ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट
ऑनलाईन आधार कसे लॉक कराल?
UIDAI ला लॉक करण्यासाठी १६ अंकांचा व्हीआयडी नंबर असणे गरजेचे आहे. कार्ड लॉक करायचे असेल तर ते आवश्यक आहे. जर एखाद्याकडे व्हीआयडी नसेल तर तो एसएमएस सेवा किंवा वेबसाइटद्वारे जनरेट करू शकतो. तुम्ही खालीलप्रमाणे आधार कार्ड लॉक करू शकता.
१) युआयडीएआय च्या वेबसाईटवर जाऊन किंवा या लिंक https://resident.uidai.gov.in/bio-lock वर क्लिक करा.
२) माय आधारवर क्लीक करून आधार सेवा अंतर्गत आधार लॉक-अनलॉक वर क्लिक करा.
३) आधार नंबरवर व्हिआयडी टाका.
४) Captcha भरून OTP नंबर येण्यासाठी क्लिक करा.
५) तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी क्रमांक टाका.
६) आलेला ओटीपी नंबर टाकल्यावर सक्षम करा' बटणावर क्लिक करा.
हेही वाचा: कॅब चालक निघाला Uberचा मालक!
तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक केली जाईल. तुम्हाला याचा परत उपयोग करायचा असेल तर ही माहिती अनलॉक करावी लागेल.
आधार बायोमेट्रिक ऑनलाइन अशाप्रकारे करा अनलॉक
१) www.uidai.gov.in वर जा.
२) 'माय आधार' टॅबवर क्लिक करा. त्यात 'आधार सेवा' अंतर्गत, 'आधार लॉक/अनलॉक' वर क्लिक करा.
३) UID अनलॉक हा पर्याय निवडा. त्यानंतर व्हर्च्युअल आयडी आणि सुरक्षा कोड टाका.
४) ओटीपी पाठवा' वर क्लिक करा. 'OTP' टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
५) तुमचा आधार क्रमांक अनलॉक होईल
हेही वाचा: Office Wear Ideas: ऑफिसमध्ये स्टाईलिश दिसायचंय! या टिप्स लक्षात ठेवा
Web Title: How To Lock Unlock Aadhaar Biometric Details
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..