

Government-issued updated regulatory guidelines for pan masala companies, highlighting new compliance and safety requirements.
esakal
New Government Guidelines for Pan Masala Companies : पान मसाला कंपन्यांसाठी सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने एक मोठा आणि महत्त्वाचा बदल लागू केला आहे. यानुसार आता, कोणत्याही आकाराच्या किंवा वजनाच्या पान मसाला पॅकेटवर किरकोळ विक्री किंमत आणि इतर सर्व अनिवार्य तपशील स्पष्टपणे दर्शवणे आवश्यक असणार आहे.
सरकारच्या या पावलामागे विभागाने दोन मुख्य उद्दिष्टे सांगितली आहेत. ज्यामध्ये ग्राहक संरक्षण लक्षात घेत दिशाभूल करणाऱ्या किंमतींना प्रतिबंध करणे आणि GST व महसूल संकलन सुलभ करणे यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार लिगल मेट्रोलॉजी रूल्स - २०११ अंतर्गत हा नियम सुधारित करण्यात आला आहे आणि तो १ फेब्रुवारी २०२६ पासून देशभरात लागू देखील होणार आहे. त्यामुळे या तारखेपासून, सर्व उत्पादक, पॅकर्स आणि आयातदारांना त्याचे पालन करणे आवश्यक असणार आहे. परिणामी आता पान मसाला खाणाऱ्यांनाही ते खात असलेल्या पान मसाल्याच्या किंमतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
नियमातील या दुरुस्तीचा पान मसाल्याच्या लहान पॅकेट्सवर सर्वाधिक परिणाम दिसणार आहे. जुन्या प्रणाली अंतर्गत, १० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाच्या लहान पॅकेटना काही नियमांमधून सूट देण्यात आली होती. मात्र आता नवीन प्रणाली अंतर्गत, ही सूट आता पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे. नव्या नियमानुसार आता, १० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाच्या पॅकेट्सवर देखील किरकोळ विक्री किंमत आणि सर्व अनिवार्य माहिती स्पष्टपणे दर्शवणे आवश्यक असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.