
हरियाणातील पंचकुला येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. पीडित कुटुंबातील लोक डेहराडूनचे रहिवासी होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ७ जणांनी कारमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. पंचकुला येथील सेक्टर २७ मधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये या सर्वांचे मृतदेह बंद अवस्थेत आढळले. कुटुंबातील सदस्य कर्जबाजारी होते आणि आर्थिक संकटाचा सामना करत होते असे सांगितले जात आहे.