नवी दिल्ली - सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील ५६२ संस्थाने देशामध्ये सामील करून घेतली. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे व्याप्त काश्मीर भारतात सामील होऊ शकला नाही, असा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत केला..राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या वैभवशाली प्रवासाच्या राज्यसभेतील चर्चेत बोलताना जे. पी. नड्डा यांनी नेहरूंच्या धोरणावर टीका केली. स्वातंत्र्यानंतर देशात अनेक संस्थानिक होते. या संस्थानांना सामील करून घेण्याची जबाबदारी गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्यावर होती. ही जबाबदारी यांनी यशस्वीपणे पार पडली..परंतु राज्य जम्मू-काश्मीरला भारतात सामील करून घेण्याची जबाबदारी पंडित नेहरूंवर होती. परंतु ती जबाबदारी नेहरूंना पार पडता आली नाही. जम्मू व काश्मीरचे राजा हरिसिंह यांनी शरणागती पत्करल्यानंतर शेख अब्दुल्ला यांना राजकारणात आणण्याचे काम पंडित नेहरू यांनी केले..जम्मू व काश्मीर विशेष दर्जा देण्यासाठी ३७० कलम राज्यघटनेत घालण्यात आले. या कलमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता. एवढेच नव्हे तर अध्यादेश काढून राज्यघटनेत ३५ ए हे कलम आणखी जोडण्यात आले. हा राज्यघटनेतील काळा अध्याय आहे.या कलमाचा श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी विरोध केला व त्यांचा संशयास्पद स्थितीमध्ये मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले..जम्मू व काश्मीरमुळे दोन विधान, दोन निशाण व दोन प्रधान अस्तित्वात आले. हा नेहरूंच्या धोरणाचा परिपाक होता. याची दुरुस्ती २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीरला मुख्य प्रवाहात सामील करून घेतल्याचा दावा जे. पी. नड्डा यांनी केला..गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षणकाँग्रेसच्या काळात देशाच्या सीमांवर सुद्धा आक्रमण झाल्याचा आरोप करून केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले, १९६२ मध्ये चीनने भारताची मोठी जमीन ताब्यात घेतली. काँग्रेसने धार्मिक आधारावर आरक्षण दिल्याचा आरोप नड्डा यांनी केला. यावर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी आक्षेप घेतला. काँग्रेसने कधीही असे आरक्षण दिले नाही. याउलट गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण दिल्याचा दाखला दिला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.