Pandora Papers : अनिल अंबानी, सचिन तेंडुलकर अन् हरिश साळवे... पँडोरा पेपर्सच्या चौकशीत काय सापडलं?

काही दिवसांपूर्वी आलेल्या पनामा पेपर्स नंतर आता पँडोरा पेपर्स समोर आले आहेत. यामधून समोर आलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Pandora Papers
Pandora Papers
Updated on

Pandora Papers Latest News : काही दिवसांपूर्वी आलेल्या पनामा पेपर्स नंतर आता पँडोरा पेपर्स समोर आले आहेत. यामधून समोर आलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. पँडोरा पेपर्समधून जगभरातल्या अनेक राजकारणी आणि धनाढ्य लोकांच्या छुप्या मालमत्तेची माहिती मिळाली असून यामध्ये भारतातील अनेक दिग्गजांची नावे देखील समोर आली आहेत.

पँडोरा पेपर्समध्ये जवळपास ३८० भारतीयांची नावे आहेत ज्यांच्याविरोधात कारवाई देखील सुरू झाली आहे. पँडोरा पेपर्समध्ये उद्योगपतींपासून ते देशसोडून पळालेल्या उद्योगपतींचा देखील समावेश आहे. पँडोरा पेपर्समध्ये उद्योगपती अनिल अंबानी, नीरव मोदी, क्रिकेटर सचिन तेंडूलकर, जॅकी श्रॉफ, नीरी राडिया, हरीश साळवे यांच्यासह अनेक बड्या दिग्गजांची नावे आहेत.

दरम्यान ज्यांची नावे या यादीत आहेत त्याच्या परिसरांमध्ये शोध घेण्यासाठी समन्स, संपत्ती जप्त करणे, आयकर आणि आरबीआयकडून माहिती मिळवण्यासाठी यंत्रणांकडून काम देखील सुरू झाले आहे.

'द इंडियन एक्सप्रेसच्या अन्वेहस्टिगेटीव्ह रिपोर्ट'नुसार या प्रकरणाच्या चौकशीत गौतम सिंघानिया, ललित गोयल, मालविंदर सिंह यांचा देखील समावेश आहे. पँडोरा पेपर्समध्ये १४ ऑफशोर सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या एक कोटी १९ लाख गुप्त दस्तावेजांचा उल्लेख आहे. यामध्ये अमाप पैसा असलेल्या लोकांकडून ग्लोबल मनी फ्लो मॅनेज करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या २९,००० ऑफशोअर संस्थांच्या मालकीबद्दल माहिती देण्यात आली आहे.

हा डेटा इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नलिस्ट्स (ICIJ) कडून मिळाला असून १५० मीडिया पार्टनर्ससोबत तो शेअर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या चौकशीचे नेतृत्व करण्यासाठी एक मल्टी एजेंसी ग्रुप (एमएजी) च्या स्थापनेची घोषणा देखील केली. यानंतर आयकर विभागाने भारतीय नागरिकांना निर्देश दिले आहेत.

Pandora Papers
RBI Ban on Paytm Payments Bank : एका PAN वर बनवले 1000 अकाउंट... पेटीएमवर झालेल्या कारवाईचं कारण आलं समोर

अनिल अंबानी

पँडोरा पेपर्सनुसार एडीए ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी त्यांचे प्रतिनिधी जर्सी (British Virgin Islands) आणि सायप्रस येथे कमीत कमी १८ ऑफशोर कंपन्यांचे मालक आहेत. २००७ आणि २०१० च्या दरम्यान स्थापन केलेल्या या कंपन्यांपैकी सात कपन्यांनी उधार रक्कम घेतली आणि कमीत कमी १.३ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली. या कंपन्यांना मॅनेज करणाऱ्या सर्व्हिस प्रोवायडरने सांगितलं की बँकाकडून घेतलेल्या कर्जाची गरंटी रिलायन्स (अनिल अंबानी) यांनी घेतली होती. अंबानी यांच्या वकीलांनी सांगितलं होत की भारतीय कायद्याचे पालन करत सर्व खुलासे करण्यात आले होते.

ईडीने सर्व रिपोर्ट करण्यात आलेल्या संस्थांची माहिती मागितली आहे. तीन भारतीय कंपन्यांना निर्देश देण्यात आले आङेत. फेमा अंतर्गत अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांना समन्स पाठवण्यात आला होता आणि त्यांच्या जबानी ईडीच्या मुंबई कार्यालयात घेण्यात आले आहेत.

Pandora Papers
Ganpat Gaikwad : 'त्याच' प्रकरणात महेश गायकवाड यांच्यावर दाखल होता गुन्हा; पोलिसांनी पाळली गुप्तता

सचिन तेंडुलकर

पँडोरा पेपर्स अनुसार क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य बीव्हीआय कंपनी सास इंटरनॅशनल लिमिटेड चे बेनेफिशियल ओनर होते. पनामा पेपर्स बाहेर आल्यानंतर लगेच २०१६ मध्ये सास इंटरनॅशनल बंद करण्यात आली होती. कंपनी बंद झाल्यानंतर शेअर शेअरधारकांकडून (तेंडुलकर, त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर आणि त्यांचे वडील) पुन्हा खरेदी करण्यात आले. पँडोरा पेपर्स मध्ये कुटुंबियांना PEPs (Politically Exposed Person) म्हणून लिस्ट करणअयात आलं आहे, काऱण सचिन तेंडुलकर माजी खासराद देखील होते.

फेमाचा वापर करत ईडीने क्रिकेट स्टार सचिन तेंडुलकर यांच्या आयटीआर साठी आयकर विभागाला पत्र पाठवलं आहे. सासबद्दल माहिती मागण्यासाठी सचिन तेंडुलकर यांच्या कंपनीचे सीईओ आणि त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट यांनाही निर्देश दिले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Pandora Papers
Jharkhand Floor Test : ''माझ्या अटकेत राजभवनाचा हात'', बहुमत चाचणीपूर्वी हेमंत सोरेन यांचा गंभीर आरोप

हरीश साळवे

पँडोरा पेपर्सनुसार हरीश साळवे यांनी लंडन मध्ये एका संपत्तीची मालकी मिळवण्यासाठी २०१५ मध्ये बीव्हीआय मध्ये द मार्सुल कंपनीचे अधिग्रहण केलं. त्यांना कंपनी बेनिफिशियल ओनर आणि सचिव असल्याचे दाखवणयात आले आणि त्यांना देखील PEPs म्हणून नोंदवण्यात आले . हरीश साळवे यांनी तेव्हा सांगितलं होतं की त्यांनी संपत्ती ठेवणअयासाठी मार्सुल मध्ये शेअर खेरेदी केले होते आणि ते एक एमआरआय असल्याने त्यांना कोणत्याही ऑफशोर कंपनीत शेअर खरेदी करण्यासाठी आरबीआयच्या परवानगीची आवश्यकता नव्हती.

ईडीने पनामा पेपर्समध्ये त्यांचं नाव आल्यानंतर हरीश साळवे यांची चोकशी आधिपासूनच सुरू होती. त्यांच्या आटीआर रिटर्न्ससाठी आयटी अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com