esakal | पँडोरा पेपर्सच्या यादीत हरीश साळवेंचं नाव, विदेशात विकत घेतली कंपनी
sakal

बोलून बातमी शोधा

harish salve

Pandora Papers : हरीश साळवेंनी विदेशात विकत घेतली कंपनी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील हरीश साळवे (Harish Salve) यांचे नाव देखील पँडोरा पेपर्सच्या (Pandora papers) यादीत असल्याचे पुढे आले आहे. त्यांनी लंडनमध्ये अपार्टमेंट घेण्यासाठी 2015 मध्ये ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समधील द मार्सूल कंपनी (The marsul company) लिमिटेड विकत घेतली, असे पँडोरा पेपर्समधून समोर आले आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

हेही वाचा: करबुडव्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरचं नाव- पँडोरा पेपर्स

कंपनीच्या एजंटने तयार केलेल्या सदस्यांच्या नोंदणीनुसार, साळवे यांना 15 सप्टेंबर 2015 रोजी मार्सूलमध्ये 50,000 शेअर्स वाटप करण्यात आले. या सभासदांची नोंदणी ही मूलत: कंपनीच्या भागधारकांची यादी असते. कंपनीचे फायदेशीर मालक म्हणून साळवे यांचे नाव देण्यात आले आहे, ज्यामुळे कंपनी त्यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट होते. ते मार्सूलचे संचालक आणि सचिव देखील आहेत, असेही पेपर्समधून समोर आले आहे.

लंडनमध्ये पार्क टॉवरमधील फ्लॅट या कंपनीच्या मालकीचे होते. त्यामुळे मी मर्सूल कंपनी विकत घेतली. मी एनआरआय होतो, त्यामुळे कोणत्याही परवानगीची आवश्यकता नव्हती., असे हरीश साळवे यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले. याबाबत आयकर विभागाला माहिती दिली आहे का? हे विचारले असता ते म्हणाले, की ''हे पूर्णपणे उघड होते. त्यामुळे ते सर्वांनाच माहिती होते. माझ्या माहितीप्रमाणे करविभागाने त्याची चौकशी केली होती. त्यानंतर मी कर देखील भरले होते'', असेही साळवी म्हणाले.

साळवे म्हणाले की, क्यूआयबी (कतार मुख्यालय असलेली बँक) कडून मिळालेल्या कर्जामधून मालमत्ता विकत घेतली. तसेच कोट्ट्स बँकमधील परत पैसे घेतले. मी त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले. ही मालमत्ता घेण्यासाठी ATED चा कर भरावा लागतो. मालमत्ता भाड्याने देतपर्यंत मी हा कर भरत होतो. मात्र, आता मालमत्ता भाड्याने दिली आहे. आरबीआयला कळवण्यात आले का, यावर साळवे म्हणाले, "मी एनआरआय असल्याने मला परवानगीची गरज नव्हती आणि यूकेमध्ये माझ्या निधीमधून मी मालमत्ता घेतली.''

दरम्यान, सचिन, त्याची पत्नी अंजली आणि सासरे आनंद मेहता यांची ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्समधील एका कंपनीचे Saas International चे लाभार्थी म्हणून नोंद आहे. 2016 साली पँडोरा पेपर्स प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यांनी या कंपनीतले शेअर्स काढून घेण्यात आले. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे देखील नाव या पेपर्समधून समोर आल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं होतं.

loading image
go to top