esakal | करबुडव्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरचं नाव? 'पँडोरा पेपर्स'मधून दावा | Sachin Tendulkar
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin-Tendulkar-Anjali

अनिल अंबानींसह आणखीही अनेक नावांचा समावेश

करबुडव्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरचं नाव- पँडोरा पेपर्स

sakal_logo
By
विराज भागवत

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून कर्जबुडव्यांची संख्या सर्वत्र वाढताना दिसत आहे. टॅक्स हेवन्स म्हणजेच करबुडव्यांचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या विविध देशांमध्ये अनेक लोक आपली कमाई लपवत असून त्याचा वापर कर चुकवणयासाठी केला जात असल्याची चर्चा आहे. तशातच जगभरातील अनेक श्रीमंत लोकांनी आपले पैसे विदेशातील काही बँकांमध्ये आणि कंपन्यांमध्ये गुंतवलेले असून ते लोक कोण कोण आहेत? याची यादी 'पँडोरा पेपर्स' कडून सांगण्यात आली आहे. करचोरी करून गुप्त गुंतवणूक केलेल्या लोकांच्या यादीत भारतातील अनेक बड्या नावांचा समावेश आहे. याच नावांमध्ये भारतरत्न, मास्टर ब्लास्टर अशा उपाधी असलेल्या सचिन तेंडुलकरचे नावही समाविष्ट असल्याचा दावा पँडोर पेपर्समधून करण्यात आला आहे.

हेही वाचा: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर रूग्णालयात दाखल

'पँडोरा पेपर्स'चा दावा

'इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स' (ICIJ) यांनी जगभरातील सुमारे १.१९ कोटी कागदपत्रे शोधून काढली असून यामध्ये जगभरातील अनेक बड्या हस्तींची नावं आहेत. या व्यक्तींच्या बेहिशेबी मालमत्ता, करचोरी व अवैध प्रकारे केलेल्या गुंतवणुकी याविषयी पँडोरा पेपर्समध्ये खुलासा करण्यात आला आहे. ICIJ च्या या शोध पत्रकारिता तपासात ११७ देशांमधील तब्बल ६०० पत्रकारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: 'मी विराटच्या जागी असतो तर...'; वाचा सचिन तेंडुलकर काय म्हणाला

Sachin Tendulkar

Sachin Tendulkar

पँडोरा पेपर्स या नावाने प्रसिद्ध झालेल्या यादीत प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी, भारतातून फरार असलेला नीरव मोदी याची बहिण, किरण मुजुमदार शॉ यांचे पती तसेच प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व त्याची पत्नी आणि सासरे यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रमुख व्यक्तींवर करचोरी व गुप्त गुंतवणुकीचा ठपका ठेवला गेला आहे. पँडोरा पेपर्सच्या यादीत ३०० पेक्षा जास्त भारतीयांचा समावेश असून यातील ६० व्यक्ती आणि कंपन्या या महत्त्वाच्या असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: सचिन तेंडुलकर, सुनील गावसकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, पाहा फोटो

Sachin Tendulkar

Sachin Tendulkar

पँडोरा पेपर्सच्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सचिनचे सासरे आनंद मेहता या तिघांच्या नावाने ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील एका कंपनीतील शेअर्स विकत घेण्यात आले होते. ही कंपनी मोडीत काढताना सचिनच्या नावे ९ शेअर्स ($८५६,७०२ किमतीचे), अंजली तेंडुलकरच्या नावे १४ शेअर्स ($१,३७५,७१४ किमतीचे) आणि आनंद मेहता यांच्या नावे ५ शेअर्स ($४५३,०८२ किमतीचे) असल्याचा दावा पँडोर पेपर्समध्ये करण्यात आला आहे.

या दाव्यावर अद्याप सचिन किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

loading image
go to top