esakal | तीन आठवड्यात सात मुलांचा मृत्यू, आरोग्य अधिकाऱ्यांनी गावात ठोकला तळ
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination to Children

तीन आठवड्यात सात मुलांचा मृत्यू, आरोग्य अधिकाऱ्यांनी गावात ठोकला तळ

sakal_logo
By
दीनानाथ परब

पलावल: कोरोना काळ (corona) आणि सार्वजनिक आरोग्यासाठी आणीबाणीची स्थिती (public health emergency) असताना हरयाणातील (Haryana) एका गावामध्ये चिंताजनक स्थिती आहे. पलावल पासून २० किमी अंतरावर असलेल्या चिली गावामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे. या गावामध्ये मागच्या तीन आठवड्यात सात मुलांचा मृत्यू (children death) झाला आहे. ही सर्व मुलं १४ वर्षापेक्षा कमी वयोगटातील आहेत.

एकाच गावात लहान मुलांचे एकापाठोपाठएक इतके मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. आजाराचे निदान आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यानी या गावामध्ये तळ ठोकला आहे. डेंग्यु, न्यूमोनिया, गॅस्ट्रो ते स्वच्छतेअभावी मच्छरांपासून होणारे आजार अशा वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. डेंग्युच्या साथीमुळे इतके मृत्यू झाल्याचा रहिवाशांचा दावा आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: देशासोबत गद्दारी, पाकला सिक्रेट माहिती देणाऱ्या DRDO च्या चौघांना अटक

आरोग्य यंत्रणेच्या टीममध्ये साथरोगतज्ज्ञ, विज्ञान अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांचा समावेश आहे. ते आजाराच्या पॅटर्नचा अभ्यास करत आहेत. पण अजूनपर्यंत हे मृत्यू कशामुळे झाले, ते ठोसपणे सांगितलेले नाही. गावात अस्वच्छतेमुळे उदभवणाऱ्या वेगवेगळ्या आजारांमधुन हे मृत्यू झाल्याची एक शक्यता यंत्रणेने वर्तवली आहे.

हेही वाचा: पत्नी, सासू-सासऱ्यांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या

दारोदार केलेल्या सर्वेमध्ये मागच्या २० दिवसात सात मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. गावचे रहिवाशी आणि सरपंचांनी नऊ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. "आम्ही डेंग्युची शक्यता फेटाळलेली नाही. पण सध्याच्या घडीला आम्ही गावातून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये एकही डेंग्यु पॉझिटिव्ह नमुना आढळलेला नाही" असे पलावलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रह्मदीप संधु यांनी सांगितले.

loading image
go to top