

दिवाळीनंतर देशभरात वायुप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच, पश्चिम बंगालमधील भाजप आमदार पापिया अधिकारी यांच्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'फटाके फोडल्याने अनेक आजार बरे होतात,' असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात टीका होत आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक आधार नसलेल्या दाव्यांमुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा