Who Is Paras Yadav? गुगलमध्ये २ कोटींचे पॅकेज; अमेरिकेतील कार्यालयात मिळाली संधी, IIT मधून घेतले शिक्षण... कोण आहे पारस यादव?

Who Is Paras Yadav? Kanpur Engineer Selected for Google's US Office : IIT कुर्नूलमधून बीटेक पूर्ण केलेल्या पारस यादवने गुगलमध्ये दोन वर्षांच्या कामगिरीनंतर अमेरिकेतील किर्कलँड कार्यालयात स्थान मिळवले असून त्याला वार्षिक सुमारे दोन कोटींचे पॅकेज मिळाले आहे.
Kanpur's Paras Yadav selected for Google's Kirkland office in the USA with an annual salary package of approximately ₹2 crore after completing his BTech in Computer Science from IIT Kurnool

Kanpur's Paras Yadav selected for Google's Kirkland office in the USA with an annual salary package of approximately ₹2 crore after completing his BTech in Computer Science from IIT Kurnool

esakal

Updated on: 

कानपूरमधील तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर पारस यादव याने आपल्या कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलने पारसची अमेरिकेतील किर्कलँड कार्यालयासाठी निवड केली आहे. या आंतरराष्ट्रीय बदलीअंतर्गत त्याला वार्षिक सुमारे दोन कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. गुगलमध्ये तो एल-४ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणार आहे.

Loading content, please wait...