esakal | आई-वडिलांना संसर्ग झाल्यास मिळणार देखभाल रजा; केंद्राची नवी योजना
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Samples

आई-वडिलांना संसर्ग झाल्यास मिळणार देखभाल रजा; केंद्राची नवी योजना

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : घरात आई-वडिलांसह कोणता नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यांच्या देखभालीसाठी आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना स्पेशल कॅज्युअल लिव्ह (SCL) मिळणार आहे. केंद्रीय वैयक्तिक मंत्रालयानं काढलेल्या एका आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. (Parental care leave if corona is found positive New plan of the center)

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये कोविड रुग्णालयात ऑक्सिजन गळती!

मंत्रालयाच्या आदेशात म्हटलं की, जर केंद्र सरकारच्या कोणत्या कर्मचाऱ्याच्या घरी आई-वडिलांसह इतर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास आणि त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर संबंधित कर्मचाऱ्याला १५ दिवसांसाठीची SCL मिळणार आहे. या सुट्ट्यांव्यतिरिक्त त्यांच्या हक्काची रजाही त्यांना घेता येणार आहे. याद्वारे आपल्या पालकांना डिस्चार्ज मिळेपर्यंत ते सुट्ट्या घेऊ शकतात.

कोरोना संकटात वाढल्या चौकशा

कोरोनाच्या या संकटकाळात भारत सरकारच्या वैयक्तिक मंत्रालयाकडे (पर्सनल मिनिस्ट्री) कोविड-१९ रुग्णालयात भरती होण्यामुळे देखभाल आणि क्वारंटाइनच्या काळासंदर्भात सुट्ट्यांबाबत अनेक लोकांनी चौकशी केली होती. याची दखल घेत मंत्रालयानं याबाबत एक विस्तृत आदेश जाहीर केला आहे. सरकारी कर्मचारी कोरोना संकटामळं खूपच अडचणीतून जात असल्याचंही या आदेशात म्हटलं आहे. जर एखादा सरकारी कर्मचारी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास त्या व्यक्तीला २० दिवसांची थेट सुट्टी मिळू शकते. रुग्णालयातून घरी आल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये रहायचं असल्यासही त्याला सुट्टी मिळू शकते.

आदेशात विशेष काय म्हटलंय?

पर्सनल मंत्रालयाने आदेशात म्हटलंय की, जर कोरोना संक्रमित कर्मचारी रुग्णालयात भरती झाला. त्याला २० दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात रहावं लागतं असेल तर त्याला डिस्चार्ज कार्ड दाखवल्यास सुट्टी मिळू शकते. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याला विशेष कॅज्युअल लिव्ह म्हणून १५ दिवसांची सुट्टी मिळू शकते जर त्याच्या घरातील कोणता नातेवाईक किंवा आई-वडील कोरोनाबाधित झाले असतील तर. तसेच आदेशात पुढं असंही म्हटलंय की, जर केंद्रीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यास आणि ती होम आयसोलेशनमध्ये राहिल्यास त्याला सुरुवातीला ७ दिवसांसाठी ऑनड्युटी मानलं जाईल.

loading image
go to top