Gujrat: संतापजनक! नवजात मुलीला जिवंत गाडलं; आई-वडिलांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Gujrat: संतापजनक! नवजात मुलीला जिवंत गाडलं; आई-वडिलांना अटक

जानेवारी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेटी बचाओ , बेटी पढाओ चा नारा दिला होता. मुलीला गर्भातच संपवण्याचं प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारने मुलींना वाचवा असा नारा दिला, तर त्यांच्या शिक्षणासाठी बेटी पढाओचा नारा दिला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या गुजरात राज्याचे आहेत. त्याच गुजरातमध्ये नवजात मुलीला जिवंत गाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी झाली म्हणून गुजरातमध्ये आई-वडिलांनीच नवजात मुलीला अक्षरक्ष: जिवंत गाडलं.

गुजरातमधील गंभोई गावात ही घटना घडलीय. हे बाळ साडेसात महिन्यात जन्मलं आहे. त्याची प्रकृती नाजूक होती. तर बाळाचे वडील शैलेश बेरोजगार होते. त्यामुळे तो आपल्या गर्भवती पत्नीसह सासरी राहत होता. वेळेआधी जन्मलेल्या बाळाच्या हॉस्पीटलचा खर्च करण्याची ऐपत नसल्याने हे पाऊल उचलल्याचे नवजात बाळाच्या आरोपी आई-वडीलांनी सांगितलं.

गुरुवारी ४ ऑगस्टला सकाळी ६ वाजता मंजुळाने साडेसात महिन्यातच बाळाला जन्म दिला. वेळेआधी जन्म झाल्याने नवजात बाळाची प्रकृती नाजूक होती. पण मुलगी जन्माला आल्याने तिला एका शेतात जिवंत जमिनीत गाडलं. जेणेकरुन तिचा मृत्यू होईल. बे बाळ शुक्रवारी एका शेतकऱ्याला दिसलं.

जितेंद्रसिंह धाबींचं हे शेत होतं. त्यांनी हे बाळ बाहेर काढलं. बाळाची नाळ असल्याने ते जिवंत होतं. मागील आठ महिन्यात गुजरात राज्यात आठ नवजात बालकांना अशाच पद्धतीने जिवंत गाडल्याच्या घटना घडल्या दुर्दैवाने सगळ्यांचा मृत्यू झाला होता. यातील पाच या नकोश्या असलेल्या मुली होत्या. टाईम्स ऑफ इंडियाने ही माहीती दिलीय.

हेही वाचा: बालसंगोपन योजनेला मर्यादेचे साखळदंड! 800 मुलांचा शिक्षणासाठी संघर्ष

नवजात बालकाला गाडल्याचं आणि ते जिवंत असल्याचं उघडकीस येता मेहसाना जिल्हा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बाळाच्या पालकांची शोध मोहीम हाती घेतली होती. या नवजात बाळाचे आई-वडील मेहसाना जिल्ह्यातील कडी गावात लपून बसले होते. एक गर्भवती बाई आणि तिचा पती गुरुवार सकाळपासून बेपत्ता असल्याची टिप पोलिस उपनिरिक्षकाला मिळाली होती.

या माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेबरोबरच विशेष पथक या प्रकरणात नवजात बालकाच्या आई-वडीलांचा शोध घेतला. या आरोपी आई-वडीलांच्या विरोधात भारतीय दंड संहीता विधान कलम ३०७, कलम ३१७ आणि कलम ४४७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Parents Buried Newborn Girlchild Alive In Gujrat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :GujaratNarendra Modicrime