esakal | शाळा नव्या शैक्षणिक वर्षातच सुरु करा;६९ टक्के पालकांचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा नव्या शैक्षणिक वर्षातच सुरु करा;६९ टक्के पालकांचे मत

नवे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर एप्रिलमध्ये शाळा पुन्हा करण्यास६९टक्के पालक राजी आहेत. या सर्वेक्षणात देशभरातील१९हजार पालक सहभागी झाले होते. ‘लोकल सर्कल्स’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने हे सर्वेक्षण केले. 

शाळा नव्या शैक्षणिक वर्षातच सुरु करा;६९ टक्के पालकांचे मत

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणुमुळे शैक्षणिक विश्वही ढवळून निघाले. एका नव्या सर्वेक्षणानुसार, आता नवे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर एप्रिलमध्ये शाळा पुन्हा करण्यास ६९ टक्के पालक राजी आहेत. या सर्वेक्षणात देशभरातील १९ हजार पालक सहभागी झाले होते. ‘लोकल सर्कल्स’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने हे सर्वेक्षण केले. 

यापैकी २६ टक्के पालकांनी कोरोना लस उपलब्ध करून दिल्यास एप्रिलपर्यंत किंवा शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी ती देण्यास संमती दर्शविली. त्याचप्रमाणे, आपण लसीकरणाचा डाटा आणि निष्कर्षांनुसार मुलांना लस देण्यास आणखी तीन किंवा अधिक महिने वाट पाहण्यास तयार असल्याचे ५६ टक्के पालकांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या उद्रेकानंतर देशभरातील शाळा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्या. त्यानंतर, कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर काही राज्यांत १५ ऑक्टोबरपासून त्या अंशत: सुरु करण्यात आल्या. बिहार, आसाम, केरळ, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि सिक्किम आदी राज्यांमध्ये या महिन्यापासून शाळेची घंटा पुन्हा वाजली आहे. या राज्यांत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. देशाच्या राजधानीत मात्र कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतरच शाळा पुन्हा सुरू होतील. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयसीएसईच्या शाळा अद्याप बंदच 
देशातील विविध राज्यांतील आपल्याशी संलग्न शाळा चार जानेवारीपासून पुन्हा सुरु करण्याची विनंती द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (सीआयएससीई) केली होती. आगामी ‘आयसीएसई’ परीक्षांसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

सर्वेक्षणात सहभागी एकूण पालक - १९ हजार 
मुलांच्या कोरोना लसीकरणास परवानगी देणारे पालक (आकडे टक्क्यांत)  -२६ 
लसीकरणाच्या निष्कर्षांनुसार मुलांना लस देणारे पालक - ५६ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

loading image