परिणीतीचे सरकारविरोधात ट्विट अन् गमावले ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद

Parineeti Chopra Removed As The brand ambassador Of Beti Bachao Beti Padhao Campaign after anti government post
Parineeti Chopra Removed As The brand ambassador Of Beti Bachao Beti Padhao Campaign after anti government post

चंदीगड : नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू असतानाच बॉलिवूड कलाकारही सक्रियपणे या आंदोलनात उतरले होते. यात आघाडीवर नाव होते ते परिणीती चोप्राचे. पण एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. परिणीतीला भाजप सरकारविरोधात केलेले ट्विट महाग पडलेले दिसते. कारण तिला हरियाना सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या अभियानाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावरून हटवण्यात आले आहे. काय केले होते तिने ट्विट?

हरियानातील 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चे संचालक योगेंद्र मलिका यांनी 'आता परिणीती या मोहिमेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नाही' असे सांगितले आहे. परिणीतीने 3-4 दिवसांपूर्वी जामिया मिलिया हिंसाचारप्रकरणात सरकारविरोधात ट्विट केले होते. परिणितीने ट्विट केलं होतं की, 'जेव्हा नागरिक आपले मत मांडायला समोर येतो, तेव्हा नेहमी असा हिंसाचारच का होतो. कॅब सोडा, या देशाला लोकशाही देश म्हणून नये, असा कायदा संमत करा. निष्पाप लोकांना मारणे चुकीचे आहे.' 

हरियानात भाजपचे मनोहरलाल खट्टर यांचे सरकार आहे. तिने भाजप सरकारविरोधात ट्विट केल्याने तिला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावरून हटविण्यात आले, असे वृत्त जागरण डॉट कॉमने दिले आहे. अशाच प्रकारे सावधान इंडिया मालिकेतील सुशांत सिंह केंद्र सरकारविरोधात भूमिका घेतल्याने त्याला मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com