Parivahan Seva: सीसीटीव्ही, GPS, पॅनिक बटन अन् AI; २० वर्षांनंतर सरकारी बससेवेचा हायटेक पुनरागमन

Madhya Pradesh Bus Service : २० वर्षांनंतर सरकारी बससेवेचे पुनरागमन; AI, सीसीटीव्ही, GPS, पॅनिक बटनसह हायटेक ‘मुख्यमंत्री सुगम परिवहन’मुळे सुरक्षित, सुलभ आणि पर्यावरणपूरक प्रवासाची नवी सुरुवात
sakal

sakal

Madhya Pradesh Bus Service:

Updated on

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सरकारी प्रवासी बस सेवा तब्बल २० वर्षांनंतर नव्या रूपात पुन्हा सुरू होणार आहे. इंदूर येथील ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘यात्री परिवहन व्हिजन समिट २०२६’मध्ये मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी २५ सप्टेंबर २०२६पासून ‘मुख्यमंत्री सुगम परिवहन बस सेवा’ सुरू करण्याची घोषणा केली.

आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इलेक्ट्रिक आणि CNG बसेस तसेच ॲप-आधारित सेवांच्या माध्यमातून राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. घरापासून बस स्थानकापर्यंत आणि बस स्थानकापासून अंतिम ठिकाणापर्यंतची वाहतूकही या व्यवस्थेशी जोडली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com