काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'च्या पोस्टरवर रॉबर्ट वाड्रांचा फोटो; भाजपने म्हटलं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gandhi Family

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'च्या पोस्टरवर रॉबर्ट वाड्रांचा फोटो; भाजपने म्हटलं..

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अंतरिम-अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी गांधी कुटुंबासह त्यांच्यासोबत असलेल्या पोस्टरची छायाचित्रे शेअर केली आहेत. देशातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाने आजपासून आपली महत्त्वाकांक्षी ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली आहे. वाड्रा यांच्या फोटोवरून भाजपने भारत जोडो यात्रेवर खोचक टीका केली आहे. (Robert Vadra news in Marathi)

हेही वाचा: राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’; अभिनेत्री पूजा भट्टचे ट्विट चर्चेत, म्हणाली...

रॉबर्ट वाड्रा यांनी भारतीय ध्वजाच्या इमोटिकॉनसह ट्विटमध्ये म्हटलं "भारत जोडो". यात यांनी एक फोटो शेअर केला असून काँग्रेस कार्यकर्त्याने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या पत्नी प्रियंका गांधी वाड्रा यांचे फोटोही पोस्टरवर टाकले आहेत. प्रियंका गांधी-वाड्रा या पक्षाच्या सरचिटणीस आहेत. रॉबर्ट वाड्रा याच्याकडे काँग्रेसचे कोणतही पद नाही.

या पोस्टर्सवरून भाजपने काँग्रेसवर कडक शब्दांत टीका केली आहे. भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनी ट्विट केले की, "काँग्रेसचा भारत जोडो म्हणजे केवळ परिवार जोडो आणि भ्रष्टाचार जोडो आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही हे पाहा. शेहजाद यांनी वॉड्रा यांचे ट्विट रिट्विट केलं आहे.

वॉड्रा यांनी याआधीच राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी यांची चौकशी केल्यानंतर वॉड्रा यांनी राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या देशात बदलाची गरज आहे. जर लोकांना वाटत असेल की मी देशात बदल घडवू शकतो, तर मी राजकारणात प्रवेश करेन, असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं होतं.

काँग्रेस नेते राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर असा 3,570 किमी लांबीची भारत जोडो यात्रा करणार आहेत. यावेळी ते 12 राज्यांमध्ये जाणार आहेत.

Web Title: Parivar Jodo Bjps Swipe At Congress Over Posters Showing Robert Vadra With Gandhis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..