23 Years of Parliament : लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या संसदेवरील हल्ल्याला आज २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी २००१ मध्ये लष्कर ए तैयबाच्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला करत एके ४७ ने अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात संसदेची सुरक्षा करणारे कर्मचारी आणि दिल्ली पोलीस असे एकूण नऊ जण शहीद, तर १५ जण जखमी झाले होते.