esakal | संसद सदस्य पंतप्रधानांना भेटू शकत नाही का? पवार-मोदी भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar-Sanjay-Raut

संसद सदस्य पंतप्रधानांना भेटू शकत नाही का? पवार-मोदी भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: "दोन प्रमुख नेत्यांची भेट झाली. यात आश्चर्य किंवा धक्का वाटण्यासारखं काय आहे?" असा सवाल शिवसेना खासदार (shivsena mp) आणि प्रवक्ते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांच्या (sharad pawar) भेटीवर विचारला. "शरद पवार माजी संरक्षण मंत्री, (defence minister) कृषीमंत्री आहेत. सहकार क्षेत्रातले दिग्गज आहेत, त्या प्रश्नासंदर्भात शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली असेल" (parliament member cant meet prime minister pawar-modi meet sanjay raut reaction dmp82)

"सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात सूडाच्या कारवाया सुरु आहेत. पवार साहेबांनी पंतप्रधान मोदींना भेटून जे सत्य आहे, ते सांगण्याची गरज होती" असे संजय राऊत यांनी सांगितलं. "शरद पवार राज्यसभेचे सदस्य आहेत. खासदार पंतप्रधानांना भेटतात. आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतात. नगरसेवक महारपौरांना भेटतात. तशीच ही भेट होती" असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा: कोणाच्याही पाठित खंजीर न खुपसण्याचा शिवसेनेचा इतिहास आहे - अरविंद सावंत

शिवसेनेला विश्वासात घेण्याच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, "विश्वासात घेण्याचा प्रश्न येतो कुठे?, संसद सदस्य पंतप्रधानांना भेटू शकत नाही का? आम्ही भेटतो, मीडियाच्या विषयांवर भेटण्यासाठी मी सुद्धा वेळ मागितली आहे. उद्धव ठाकरे आणि मोदींचे जुने संबंध आहेत तसंच पवार आणि मोदींचे सुद्धा जुने संबंध आहेत. राजकीय चर्चांना अर्थ नाही. ते दळण आहे. त्यातून काही बाहेर पडणार नाही" असे राऊत म्हणाले.

हेही वाचा: आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्धरीत्या चित्रीकरण करावे- मुख्यमंत्री  

"उद्धव ठाकरे मोदींना भेटले किंवा मोदी शरद पवारांना भेटले, म्हणून त्याचा राज्यातल्या सरकारवर परिणाम होणार नाही. भाजपाला दु:ख, वेदना आहेत. त्यांनी आमच्याकडे त्या मोकळ्या कराव्यात. आम्ही त्यांच्याशी बोलतो. भाजपाला आम्ही धीर देत असतो" असे राऊत म्हणाले.

loading image