esakal | सलग दुसऱ्या अधिवेशनाला कोरोनामुळे ब्रेक;दहा दिवसांत २५ विधेयके मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

सलग दुसऱ्या अधिवेशनाला कोरोनामुळे ब्रेक;दहा दिवसांत २५ विधेयके मंजूर

गेले दोन दिवस सभागृहात फक्त भाजप आघाडीचेच खासदार होते, याचा वारंवार उल्लेख राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आपल्या समारोप भाषणात केला. ते म्हणाले की सभागृहात ज्या घटना घडल्या त्या वेदनादायी होत्या.

सलग दुसऱ्या अधिवेशनाला कोरोनामुळे ब्रेक;दहा दिवसांत २५ विधेयके मंजूर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन आज आठ दिवस अगोदरच गुंडाळण्यात आले. कोरोना संसर्गामुळे मुदतीआधीच गुंडाळावे लागलेले हे सलग दुसरे संसद अधिवेशन ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी समारोप सत्रास उपस्थित होते. या १० दिवसांच्या अधिवेशनात २५ विधेयके मंजूर झाली, तर ६ विधेयके सादर केली गेली. त्यातील किमान ११ विधेयके वादग्रस्त कृषी कायद्यांच्या निषेधार्ह कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या खासदारांच्या संपूर्ण अनुपस्थितीत विजेच्या वेगाने मंजूर केली गेली याकडे विरोधी पक्षीय खासदारांनी लक्ष वेधले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एका ऐतिहासिक परिस्थितीत १४ सप्टेंबरपासून साप्ताहिक सुट्या न घेता झालेल्या या अधिवेशनात कोरोनाकाळामुळे लोकसभा व राज्यसभा या दोन्हींमध्ये (सभागृहांसह पाच ठिकाणी) खासदारांची आसनव्यवस्था केली गेली व दोन्ही सभागृहे दोन टप्प्यांत चालविण्यात आली. याच अधिवेशनात उपसभापतींची एकमताने निवड झाली त्याच उपसभापतींवर आठच दिवसांत अविश्‍वास प्रस्ताव आणण्यात आला. सरकारने मंजूर करून घेतलेल्या तीन कृषी विधेयकांना तीव्र विरोध झाला. यावेळी झालेल्या गोंधळात आठ खासदारांना निलंबित केल्याने सर्व विरोधी पक्षांनी राज्यसभा कामकाजावर बहिष्कार टाकला होता. गेले दोन दिवस सभागृहात फक्त भाजप आघाडीचेच खासदार होते, याचा वारंवार उल्लेख राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आपल्या समारोप भाषणात केला. ते म्हणाले की सभागृहात ज्या घटना घडल्या त्या वेदनादायी होत्या. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये व सभागृहाची प्रतिष्ठा कायम रहावी असे आवाहनही नायडू यांनी केले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संसदेचे कामकाज 
१००.४७ : कामकाजाची टक्केवारी 
३ : गोंधळाने वाया गेलेले तास 
३.२६ तास : अतिरिक्त कामकाज 
२५ : मंजूर विधेयके 
इतिहासात प्रथमच : उपसभापतींवर ‘अविश्‍वास’ 
तब्बल १० वर्षांनी : सभागृहात मार्शलची ‘गर्दी’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विरोधकांविना निरोप समारंभ ! 
वरिष्ठ सभागृह कधीही भंग होत नाही. त्यामुळे राज्यसभेतून दर दोन वर्षांनी निवृत्त होणाऱ्या खासदारांचा निरोप समारंभ व त्यातील भाषणे ही नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणाऱ्या ११ खासदारांना अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसी आज निरोप देण्यात आला. मात्र भाजपकडे गेलेले नीरज शेखर वगळता यातील १० 
खासदार यावेळी अनुपस्थित होते. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी हेही काही निर्धारित कामामुळे यावेळी हजर नव्हते. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह निवृत्त होणारे सपा नेते रामगोपाल यादव, जावेद अली खान, पी एल पुनिया आदींची भाषणे ऐकण्याची संधी यामुळे कायमची हुकल्याची भावना अनेक खासदारांनी व्यक्त केली.