Parliament Special Sitting Schedule : संसदेचे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान विशेष कामकाज! लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांबाबत किरेन रिजिजू यांची अधिकृत घोषणा

अत्यावश्यक सरकारी कामकाजासाठी सोमवार, ३० नोव्हेंबरला लोकसभा तर बुधवार, २ डिसेंबरला राज्यसभा पुन्हा भरणार; कामकाजानुसार ३ डिसेंबरला दोन्ही सभागृहांचा समारोप होण्याची शक्यता.
Both Houses of Parliament to reconvene; big announcement by Kiren Rijiju!

Both Houses of Parliament to reconvene; big announcement by Kiren Rijiju!

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अत्यावश्यक सरकारी कामकाज मार्गी लावण्यासाठी संसदेची दोन्ही सभागृहे पुन्हा बोलावण्याची अधिकृत विनंती केली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) 'एक्स' (X) वर पोस्ट करत याबाबतची सविस्तर माहिती जाहीर केली. हे एक दिवसीय अधिवेशन नसून, ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यानचे संक्षिप्त विशेष कामकाज असणार असल्याचे अधिकृत वेळापत्रकावरून स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...