
Pahalgam Attack: पहलगाममधील हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी मायदेशी परतल्यानंतर पुढील आठवड्यात यावर लोकसभेत १६ तास तर राज्यसभेत नऊ तास चर्चा घेण्याचे दोन्ही सभागृहांच्या कामकाज विषयक समित्यांच्या बैठकीत ठरले.