Parliament: केंद्र आणि विरोधकांत ‘तह’; पुढील आठवड्यात ‘वंदे मातरम’, निवडणूक सुधारणांवर चर्चा
Special Discussion on ‘Vande Mataram’: संसदेच्या पुढील आठवड्यात ‘वंदे मातरम’ आणि निवडणूक सुधारणा यावर विशेष चर्चा होणार. सरकार आणि विरोधकांमध्ये चर्चेसाठी अखेर सहमती साधण्यात आली आहे.
नवी दिल्ली : मतदारयादी फेर पडताळणी (एसआयआर) मोहिमेवर संसदेत दोन्ही सभागृहात झालेल्या गदारोळानंतर मंगळवारी यावर चर्चेसाठी सरकार आणि विरोधकांमध्ये अखेर सहमती झाली.