Argument Between Jagdeep Dhankhar And Mallikarjun Kharge: संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून आज दोन्ही सभागृहात संविधानावरील चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, त्यापूर्वी राज्यसभेत मोठा गदारोळ बघायला मिळाला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राज्यसभेचे सभापती यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज थोड्यावेळासाठी तहकूब करण्यात आलं.