MGNREGA : ‘मनरेगा’त कालानुरूप बदल गरजेचे; स्वतंत्र सर्वेक्षण करण्याची संसदीय समितीची शिफारस
Rural Employment : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सुधारणा करावी, कामाचे दिवस वाढवावेत व मजुरी ₹४०० करावी, अशी शिफारस संसदीय समितीने केली असून स्वतंत्र सर्वेक्षण व सामाजिक ऑडिट करण्याचेही सुचवले आहे.
नवी दिल्ली : ‘‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) कालानुरूप बदल होणे आवश्यक असून या योजनेचे स्वतंत्र सर्वेक्षण केले जावे,’’ अशी शिफारस ग्रामीण विकास आणि पंचायत राज संबंधित संसदीय समितीने सरकारला केली आहे.