Threat To BJP Leaders: "पक्ष सोडा नाहीतर जगातून उठवू," पाच भाजप नेत्यांना धमकीचे पत्र

Punjab BJP: पत्रात अज्ञात आरोपीने खलिस्तान आणि पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा लिहिल्या आहेत. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर भाजप नेत्यांनी याबाबत चंदीगड पोलिसांकडे तक्रार केली आहे.
Threat To BJP Leaders
Threat To BJP LeadersEsakal
Updated on

पंजाबमध्ये रोज उघडपणे लोकांवर हल्ले होत आहेत आणि राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता समोर आलेल्या प्रकरणात पंजाब भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे.

चंदीगडमधील पंजाब भाजप कार्यालयात प्लास्टिकच्या पिशवीतून धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मनजिंदर सिंग सिरसा, भाजप शीख समन्वय समिती आणि राष्ट्रीय रेल्वे समितीचे सदस्य तेजिंदर सिंग सरन आणि भाजपचे महासचिव परमिंदर ब्रार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

याशिवाय भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीनिवासुलू यांचेही नाव आहे. माजी राज्यसभा सदस्य श्वेत मलिक यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यांना ३ जुलै रोजी धमकी मिळाली होती. त्यांनी ही माहिती अमृतसर पोलीस आयुक्तांना दिली आहे.

Threat To BJP Leaders
Divorced Muslim Women: घटस्फोटित मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार आहे का? सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

डोक्यावर पगडी आहे, मग RSS सोबत का?

आरोपीने भाजप नेते परमिंदर सिंग ब्रार आणि तेजिंदर सरन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "तुम्ही लोकांनी तुमच्या डोक्यावर पगडी आहे, मग तुम्ही भाजप आणि आरएसएससोबत मिळून शीख आणि पंजाबच्या जनतेचा विश्वासघात का करत आहात. तुम्ही आरएसएसशी मिळून शीखांच्या अनेक बाबतींमध्ये ढवळाढवळ करत आहात, आम्ही तुम्हाला यापूर्वीही इशारा दिला होता. तुम्ही एकतर भाजप सोडा नाहीतर आम्ही तुम्हाला या जगातून उठवू."

Threat To BJP Leaders
Viral Video: कँटिनमध्ये चटणीच्या मोठ्या भांड्यात पोहतोय उंदीर, या कॉलेजमधला किळसवाणा Video Viral

या पत्रात अज्ञात व्यक्तीने चारही नेत्यांना भाजप सोडण्याची धमकी दिली आहे. या नेत्यांनी भाजप सोडून शीख समाजाच्या हितासाठी दुसरा मार्ग स्वीकारला नाही, तर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्यास सांगितले आहे.

पत्रात अज्ञात आरोपीने खलिस्तान आणि पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा लिहिल्या आहेत. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर भाजप नेत्यांनी याबाबत चंदीगड पोलिसांकडे तक्रार केली आहे.

यानंतर पोलिसांनी पत्रात सापडलेले साहित्य तपासासाठी पाठवले आहे. चंदिगडचे भाजप नेते आणि महापालिकेचे वरिष्ठ उपमहापौर कुलजित सिंग संधू यांनाही अलीकडेच काही धमक्या आल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.