Karnataka Result : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पार्ट २ कर्नाटकात, JDS ची अट ऐकताच काँग्रेस-भाजपची उडाली झोप

Karnataka Result
Karnataka Result

Karnataka Assembly Result : महाराष्ट्रात २०१९ ला सत्तेसाठी उद्ववलेल्या परिस्थितीचा पार्ट दोन कर्नाटकात पाहायला मिळू शकतो. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी ५०-५० मुद्यावरुन भाजपशी फारकत घेतली होती. आता कर्नाटकात त्याच भूमिकेत जेडीएस असल्याचे दिसत आहे.

कारण विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच एचडी कुमारस्वामी यांनी भाजप आणि काँग्रेसची झोप उडवली आहेत. त्यामुळे कर्नाटकात महाविकास आघाडीसारखा दुसरा पर्याय तर निर्माण होत नाही ना?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी मोठी घोषणा केली आहे. जेडीएस भाजप आणि काँग्रेससोबत सत्तेत सहाभागी होण्यास तयार असल्याचे कुमारस्वामी म्हणाले. उद्या (शनिवार) कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे कुमारस्वामी यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. मात्र कुमारस्वामी यांनी ठेवलेली अट भाजप आणि काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे.

कुमारस्वामी म्हणाले, जर भाजप आणि काँग्रेसने त्यांच्या अटी मान्य केल्या तर ते त्या पक्षाला पाठिंबा देण्यास तयार आहेत. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे ही त्यांची मुख्य अट आहे. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलने त्रिशंकू निकाल येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. काही एक्झिट पोल काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणत मताधिक्य मिळणार असल्याचे सांगितले मात्र ते देखील बहुमतापासून दूर असतील.

Karnataka Result
The Kerala Story SC : केरळ स्टोरी साऱ्या देशात सुरु, तुमच्याकडेच बंदी का? न्यायालयाची बंगाल, तामिळ सरकारला नोटीस!

कर्नाटकचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले कुमारस्वामी मतदानाच्या रात्रीच सिंगापूरला रवाना झाले होते. आपल्या भेटीपूर्वी ते म्हणाले होते की, मला विश्वास आहे की जेडीएस किमान ५० जागा जिंकेल आणि मी माझ्या अटी मान्य करणाऱ्या पक्षासोबत युती करण्यास ते तयार आहे.

काँग्रेस आणि भाजपने जेडीएसशी संपर्क साधल्याची चर्चा फेटाळून लावली आहे. भाजप नेत्यांचे म्हणने आहे की युतीचा प्रश्नच येत नाही. भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची आशा आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने नेतृत्वाने पुष्टी केली आहे की, जेडीएसने संपर्क साधला आहे की नाही हे त्यांना माहित नाही. मात्र काँग्रेस राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करणार असल्याचा त्यांना विश्वास आहे.

Karnataka Result
DY Chandrachud : एका दिवसात ३२३ खटले संपवायचे, मगच जेवायचं; चंद्रचूड यांचा निर्धार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com