फाळणीसाठी मुस्लीम नाही, तर काँग्रेस आणि जीना जबाबदार - ओवैसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi

"फाळणीसाठी मुस्लीम नाही, तर काँग्रेस आणि जीना जबाबदार"

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय हालचालींना वेग आलेला दिसतो आहे. सर्व राजकीय पक्षांच्या सभा आणि संघाटना बांधणीच्या कामांनी जोर धरला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा, सपा, बसपा आणि काँग्रेसह आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन पक्षाने देखील निवडणुकांसाठी दंड थोपटले होते. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) हे सभा घेताना दिसता आहेत. त्यातच असदुद्दीन ओवैसी यांनी फाळणीबद्दल (Partition) केलेलं एक विधान चर्चेत आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना ओवैसी यांनी फाळणीला मुस्लीम नाही तर, मोहम्मद अली जिना आणि काँग्रेस नेतेच जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत, ते म्हणाले की संघ आणि भाजपशी संबंधित लोक नीट वाचण करत नाहीत आणि फाळणीसाठी मुस्लिमांना दोष देतात. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, त्यावेळी नवाब किंवा पदवीधारकांसारख्या प्रभावशाली मुस्लिमांनाच मतदान करण्याची मुभा होती. भारताच्या फाळणीला काँग्रेस आणि त्या काळातील त्यांचे नेते जबाबदार होते, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: आरोपीचा कोठडीत मृत्यू; पोलिसांनी कुटुंबीयांना दिली नोकरीची ऑफर

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जीना यांची महात्मा गांधी, सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना करत त्यांना स्वातंत्र्य लढ्याचे नायक म्हटलं होतं. त्यानतंर देखील ओवैसींनी त्यांच्या या विधानाचा समाचार घेत भारतीय मुस्लीमांना जीनांशी काही घेणं नसल्याचं सांगितलं होतं.

loading image
go to top