आजीबाईची कमाल! कोरोनावर मात करुन साजरा करणार 100 वा वाढदिवस

corona_20patients
corona_20patients

कोलकाता- वयस्कर लोकांसाठी कोरोना विषाणू खूप धोकादायक असल्याचं मानलं जातं. पण, जगण्याची प्रबळ इच्छा मानसाला कोरोना विषाणूवरही मात करायला शिकवते. याचच उदाहरण पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालं. भवतारिणी समंता  (Bhavatarini Samantha) यांना 100 व्या जन्मदिवसाच्या एका महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण, डॉक्टर आणि परिवारातील सदस्यांना आश्चर्यांचा धक्का देत त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. 

समंता यांना 99 वर्ष 11 महिने वय असताना ताप आणि श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. त्यानंतर 24 नोव्हेंबरला त्यांना फूलेश्वर भागाताली कोविड-19 हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या तपासणीमध्ये त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

चीनची दादागिरी वाढतीये; 'अरुणाचल'जवळ वसवली 3 गावे 

हॉस्पिटलमधील अधिकारी शुभाशीष मित्रा यांनी सांगितले की समंता यांना अनेक प्रकारच्या समस्या होत्या. त्यांच्या उपचारासाठी मेडिकल टीम तयार करण्यात आली. त्यांची योग्य काळजी घेतली जाऊ लागली. वेळेनुसार त्या ठीक होऊ लागल्या. आम्हाला आनंद आहे की त्यांना कोविड-19 मुक्त करु शकलो. 100 व्या जन्मदिवसाआधीच त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. शनिवारी समंता यांना अॅम्बुलन्सद्वारे घरी पाठवण्यात आले. डॉक्टर, नर्स आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फुल आणि मिठाई भेट दिली.

साधारणपणे 60 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोनाची लागण होणे अंत्यत गंभीर आणि जीवघेणे समजले जाते. अशा लोकांना घराच्या बाहेर न निघण्याचा सल्ला दिला जातो. वयस्कर लोकांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांच्या मृत्यूचा धोका जास्त असतो. असे असले तरी हजारो असे उदाहरणे समोर आले आहेत, ज्यात 80 ते 90 वर्षांच्या वयस्कर लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com