राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोदींचा खोटा प्रचार; ममतांचा पलटवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 25 December 2020


शुक्रवारी जनतेशी संवाद साधताना नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींवर टीका केली होती.

कोलकता- राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी केंद्र सरकार खोटा प्रचार करत आहे. सत्य हे आहे की पश्‍चिम बंगाल सरकार केंद्राला सहकार्य करते पण केंद्र मात्र राज्याच्या हिताच्या योजना रोखते. केंद्राकडून ८५ हजार कोटी रुपये येणे आहेत, त्यातील ८ हजार कोटी रुपये जीएसटीची थकबाकी असल्याची टीका पश्‍चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. मोदींनी प. बंगालसाठी काहीही केलेले नाही, आता ते केवळ लोकांची दिशाभूल करत आहेत असेही बॅनर्जी म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीसांचा विक्रम तरुणीने मोडला; 21 व्या वर्षी झाली सर्वात तरुण महापौर!

शुक्रवारी जनतेशी संवाद साधताना नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींवर टीका केली होती. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 18 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. पश्चिम बंगालमधील 70 लाखांहून अधिक शेतकरी हे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीयेत. कारण बंगालमधील ममता सरकारच्या राजकारणामुळे हे शेतकरी वंचित राहिलेले आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय की, बंगालचे शेतकरी केंद्राच्या योजनांच्या फायद्यांपासून वंचित राहिलेले आहेत. बंगाल हे एकमेव असे राज्य आहे जे या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीये. ममता बॅनर्जी यांच्या विचारधारेमुळे बंगाल उद्ध्वस्त झाला आहे. त्यांच्या शेतकरी विरोधी कृत्यांमुळे मी खुप दुखावलो आहे. यावर विरोधक का गप्प आहेत? असा सवालही त्यांनी केला होता.

कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण आहे का? 4 राज्यात होणार रंगीत तालीम

जेव्हापासून ही योजना सुरु झाली तेंव्हापासून 1 लाख 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. मात्र या गोष्टीचं मला वाईट वाटत आहे की, एकमेव पश्चिम बंगालमधील 70 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित आहेत. केवळ राजकीय विचारधारेमुळे त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांपूर्वीची भाषणे ऐकली तर समजेल की त्यांच्या राजकीय विचारधारेमुळे बंगालचेच किती नुकसान झाले आहे, असं मोदी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paschim bangal mamta banarjee criticize narendra modi