esakal | पासवान यांच्या श्राद्धालाही काका-पुतण्यात दरी कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Pashupati and Chirag

पासवान यांच्या श्राद्धालाही काका-पुतण्यात दरी कायम

sakal_logo
By
उज्ज्वलकुमार

पाटणा - लोक जनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते रामविलास पासवान (Ramvilas Paswan) यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चिराग पासवान (Chirag Paswan) आणि भाऊ केंद्रीय मंत्री पशुपती पारस (Pashupati Paras) यांच्यातील अंतर पासवान यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशीही कायम राहिले. निमंत्रणावरून पासवान यांच्या निवासस्थानी जात पारस यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

पशुपती हे पासवान यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्या तसबिरीला हार घालून निघून गेले. मात्र, देवासमान असणाऱ्या आपल्या भावाच्या वर्षश्राद्धाच्या आयोजनाला मला सहभागी करून घेतले नाही, एक छापील निमंत्रण पाठवत बोलाविले, याची खंत पारस यांनी व्यक्त केली. यावेळी पत्रकारांनी चिराग यांच्याविषयी विचारले असता, ‘आज राजकारणाबाबत बोलणार नाही’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पासवान यांच्या वर्षश्राद्धानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत त्यांची आठवण काढली. मात्र, मुख्यमंत्री नितीशकुमार हे पासवान यांच्या निवासस्थानीही गेले नाही, की त्यांनी ट्विटही केले नाही. दोन दिवस आधीच नितीश यांनी किमान चार जणांच्या घरी जात त्या कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले होते.

हेही वाचा: काँग्रेसपेक्षा आम्ही सक्षम! ‘आप’ यूपीतील सर्व जागा लढविणार

पुतळा उभारण्याची मागणी

रामविलास पासवान यांचे सामाजिक कार्य पाहता पाटण्यामध्ये त्यांचा पुतळा उभारण्याची मागणी राजद नेते तेजस्वी यादव यांनी केली. ‘माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, तर पासवान यांचा का नाही? ते तर बिहारचेच नेते होते?’, असा सवालही तेजस्वी यांनी उपस्थित केला.

loading image
go to top