esakal | काँग्रेसपेक्षा आम्ही सक्षम! ‘आप’ यूपीतील सर्व जागा लढविणार
sakal

बोलून बातमी शोधा

ARvind Kejriwal.

काँग्रेसपेक्षा आम्ही सक्षम! ‘आप’ यूपीतील सर्व जागा लढविणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनौ : उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या पुढील निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) सर्व ४०३ जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी आज केली. ‘आप’ला कमकुवत समजण्याची चूक कोणी करून नये. आपला पक्ष हा काँग्रेस पेक्षाही सक्षम असल्याचे पंचायत निवडणुकीत स्पष्ट झाले आहे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.

हेही वाचा: लादेनचा साथीदार जवाहिरी जिवंतच; एका व्हिडिओद्वारे इशारे आणि चिथावणी

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्यासाठी चर्चा सुरू नसल्याचेही ‘आप’ने स्पष्ट केले आहे. ‘‘आमचा पक्ष उत्तर प्रदेशात काँग्रेस पेक्षा जास्त ताकदवान आहे. पंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने ४० जागा मिळविल्या होत्या तर ‘आप’ने ८३ जागा मिळविल्या. या निवडणुकीत ‘आप’ला एकूण ४० लाख मते मिळाली, तर पक्षाचे १६०० उमेदवार रिंगणात होते,’ असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. संजय सिंह यांच्याकडे पक्षाने उत्तर प्रदेशाची जबाबदारी दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४०३ पैकी केवळ सात जागांवर विजय मिळविता आला होता. ‘आप’ने २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभेच्या तर, प्रदेशातील काही जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना यश मिळाले नव्हते. केजरीवाल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध निवडणूक लढविली होती. तेथेही केजरीवाल दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली होती.

हेही वाचा: सर्व जनतेने घेतला पहिला डोस; 'या' राज्यांनी मिळवला पहिला मान

‘‘आम्ही राज्यातील विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहोत. राज्यात पक्षाचा पाया विस्तारण्यावर भर आहे. गेल्या दीड महिन्यांच्या काळात सुमारे दीड कोटी लोकांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. १०० ते १५० जागांसाठी आम्ही मतदारसंघनिहाय प्रमुखांची नेमणूकही केली आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांशी हे सर्व नेते चर्चा करत आहेत,’’ अशी माहिती संजय सिंह यांनी दिली.

भाजपच्या राष्ट्रवादाशी टक्कर

‘‘येत्या निवडणुकीमध्ये भाजपचा राष्ट्रवाद आणि ‘आप’चा राष्ट्रवाद अशीच लढत असेल. भाजपचा राष्ट्रवाद हा खोटा आहे. त्यांच्या राष्ट्रवादामध्ये द्वेष आणि जातीयवाद आहे. तर चांगले शिक्षण, आरोग्य, मोफत वीज व पाणी, महिलांची सुरक्षा हे ‘आप’च्या राष्ट्रवादातील मुद्दे आहेत,’’ असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. ‘आप’च्या प्रशासनाच्या प्रारुपाला भाजप घाबरतो, त्यामुळे ते सूडबुद्धीचे राजकारण करत असतात असा आरोपही संजय सिंह यांनी केला.

loading image
go to top