
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे गुरुवारी सकाळी एक अतिशय दुःखद अपघात घडला आहे. जिथे बद्रीनाथ महामार्गावरील घोलथिरजवळ एक टेम्पो ट्रॅव्हलर नियंत्रण गमावून खवळलेल्या अलकनंदा नदीत पडला. या ट्रॅव्हलरमध्ये एकूण २० लोक प्रवास करत होते. त्यापैकी ८ जण जखमी आहेत. ३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि उर्वरित बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. यातील प्रवाशांची यादी समोर आली आहे. यात महाराष्ट्रातील काही प्रवाशांचा समावेश आहे.